एव्हरेस्टवर पार पडलेल्या फॅशन शोची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नेपाळने आतापर्यंतच्या सर्वात उंचीवर फॅशन शोचे आयोजन करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. नेपाळ पर्यटन बोर्डाच्या मदतीने आरबी डायमंड्स आणि कासा स्टाइलद्वारे माउंट एव्हरेस्ट फॅशन रनवेचे आयोजन करण्यात आले होते.

या फॅशन शोचे आयोजन एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ काला पत्थर येथे 5340 मीटर (17,515 फूट) वर करण्यात आले होते. हवामान बदलाप्रती लोकांना जागृक करण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले होते.

हे आयोजन नेपाळ पर्यटन बोर्डाच्या व्हिजिट नेपाळ इअर 2020 चा एकभाग होते. या शोमध्ये फिनलँड, इटली, श्रीलंका आणि सिंगापूरसह जगभरातील अनेक मॉडेल्सनी सहभाग घेतला. फॅशन शो दरम्यान वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी नैसर्गिक व जैविक होत्या.

फॅशन शोसाठी तयार करण्यात आलेल्या कपड्यांसाठी नेपाळी पश्मीना, फेल्ट आणि याक उनचा वापर करण्यात आला आहे. हे कपडे थंडीत घालण्यासाठी सर्वोत्तम असतात. या फॅशन शोमध्ये नेपाळचे संस्कृति, पर्यटन आणि नागरिक उड्डाण मंत्रालयाचे सचिव केदार बहादूर यांच्यासह नेपाळ पर्यटन बोर्डाच्या वरिष्ठ संचालक नंदिनी लहे थापा यांनी देखील भाग घेतला होता.

Leave a Comment