ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी एकता कपूर, भूषण कुमारची हातमिळवणी


एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलसाठी सिरीयल क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर आणि बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते भूषण कुमार एकत्र आले आहेत. एकता कपूर आणि भूषण कुमार एकत्र मिळून २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक विलन’ या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करणार आहेत.


२०१४ साली मोहित सुरीचे दिग्दर्शन असलेला ‘एक विलन’ हा चित्रपट रिलीज झाला होता. श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची यामध्ये मुख्य भूमिका पाहायला मिळाली होती. यामध्ये रितेशने विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट ठरली होती. या गाण्यांची क्रेझ आजही पाहिली जाते.

या चित्रपटाबाबतची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. पण या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कोणती स्टारकास्ट असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. पण या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी हेच करणार आहेत. त्याचबरोबर हा ८ जानेवारी २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment