गणेश आचार्यचा संपूर्ण बॉलीवूडने बहिष्कार करायला हवा


#MeeToo या चळवळीमुळे बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ही बरीच चर्चेत आली होती. तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी गणेश आचार्य यांच्या विरोधात एका महिला कोरिओग्राफरनेही अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्यावर बॉलिवूडने बहिष्कार टाकावा, असे वक्तव्य तनुश्रीने केले आहे.

आता वेळ आली आहे, की कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर बॉलिवूड आणि इतर भारतीय सिने इंडस्ट्रीने पूर्णपणे बहिष्कार टाकायला हवा. असे लोक मोठ्या सुपरस्टार्सच्या आधारामुळे लपून राहतात. इतर नवीन लोकांना त्रास देतात, असे तनुश्रीने म्हटले आहे.

सध्या गणेश आचार्य विरोधात बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत. फसवणूक, डान्सर्सच्या मानधनामध्ये कपात तसेच, महिला कोरिओग्राफर्ससोबत गैरवर्तन अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तीसोबत जर दिग्दर्शक अभिनेते काम करण्यास तयार होत असतील, तर अशा कामामध्ये त्यांचाही सहभाग असेल, असेही तनुश्रीने म्हटले.

Leave a Comment