कोरोना व्हायरसचा दिग्गज टेक कंपन्यांना देखील फटका

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 170 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जगभरात 6 हजारापर्यंत रुग्णांची संख्या पोहचली असून, जगभरात या व्हायरसमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये अनेक टेक कंपन्यांनी आपले स्टोर बंद केले आहेत. या व्हायरसमुळे अ‍ॅपल, फेसबुक, सॅमसंग यासारख्या दिग्गज टेक कंपन्यांना देखील फटका बसला आहे.

फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले असून, चीनच्या अनावश्यक प्रवासावर बंदी घातली आहे. चीनची सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनी अलीबाबाने देखील 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले असून, टेनसेंट या कंपनीने 9 फेब्रुवारीपर्यंत सुट्टी दिली आहे.

अ‍ॅपलने चीनमधील आपले अनेक स्टोर बंद केले आहेत व कामाचे तास देखील कमी केलेत. अ‍ॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांनी चीनचा प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

टिकटॉकची मालकी कंपनी बाइटडान्सने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना 14 दिवस घरी राहण्यास सांगितले आहे. एलजीने आपल्या सर्व डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांना चीनला जाण्यास मनाई केली आहे.

सॅमसंगने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना चीनचा प्रवास करण्यास मनाई केली असून, 7 दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment