या कंपनीने सादर केला जगातील पहिला वहिला 5जी टॅबलेट

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपल्या स्थानिक बाजारात गॅलेक्सी टॅब एस6 5जी सादर केला आहे. हा जगातील पहिला 5जी टॅबलेट आहे. या टॅबलेटला दक्षिण कोरियाच्या बाहेर कधी लाँच केले जाईल याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

या टॅबलेटची किंमत 9,99,900 कोरियन वॉन (जवळपास 60,500 रुपये) आहे.

Image Credited – FoneArena

या टॅबचे वजन 420 ग्रॅम आहे. यामध्ये 10.5 इंचचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यात AKG-ट्यून्ड क्वाड स्पीकर्स देण्यात आले आहेत, जे Dolby Atmos ला सपोर्ट करतात. यात एस पेन स्टायल्स देखील मिळेल. गॅलेक्सी टॅब एस6 5जीमध्ये 6 जीबी रॅम + 128 जी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि 7040 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.

Image Credited – PhoneDog

कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय 802.11 ac (2.4GHz/5GHz) MIMO, वाय-फाय डायरेक्ट, ब्लूटूथ 5, जीपीएस+, यूएसबी टाईप सी, पोगो पिन यासारखे फीचर्स मिळतील.

सॅमसंग कंपनी आपले 5जी डिव्हाईस लाँच करून बाजारावर पकड मिळवत आहे. यामध्ये गॅलेक्सी एस 10 5जी, नोट 10 5जी आणि ए10 5जी स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Leave a Comment