आठवीत तीनदा नापास झाला आहे अलीबाबाचा मालक


आशियातील चौथा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून म्हणून ५३ वर्षीय जॅक मा ओळखला जातो. त्यांची एकूण संपत्ती फोर्ब्स २०१७ च्या यादीनुसार साधारण ३९.३ बिलियन डॉलर ऐवढी आहे. १९९९ मध्ये त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये जॅक मा यांनी अलीबाबाची सुरूवात केली होती.

१९९४ मध्ये जेव्हा अलीबाबाचे मालक जॅक मा अमेरिकेत गेले तेव्हा तिथे इंटरनेट पाहून आश्चर्यचकित झाले. त्यानंतर चीनमध्ये परत येऊन त्यांनी ‘चायना पेज’ लॉन्च केले. चीनची ही पहिलीच ऑनलाईन डिरेक्टरी होती. ते देशात त्यानंतर मिस्टर इंटरनेट म्हणून लोकप्रिय झाले. जॅक मा ने त्यानंतर २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये अलीबाबाची सुरूवात केली. त्यांनी ही कंपनी आपल्या १७ मित्रांसोबत सुरू केली होती. अलीबाबा ग्रुपच्या मोठ्या कंपन्यांमध्ये Alibaba.com, Taobao, Alibaba Cloud, AliExpress, Yahoo! China, Alibaba Pictures, South China Morning Post, UCWeb, आणि Lazada प्रमुख आहेत.

शिक्षणाची जॅक यांना मुळीच आवड नव्हती. पाचवीत ते दोनदा तर आठवीत तीनदा नापास झाले आहेत. कम्प्युटरशी निगडीत कोणतीही पार्श्वभूमी जॅक मा यांच्याकडे नव्हती. ते १९८० मध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागले. त्यानंतर त्यांनी एक कंपनी सुरू केली आणि त्यानंतर अलीबाबाची स्थापना झाली.

सध्या ३ हजार अरब रूपयांपेक्षाही जास्त चीनची कंपनी अलीबाबाचे मार्केट व्हॅल्यू आहे. ई-कॉमर्ससोबत अजूनही अनेक कंपन्या त्यांनी सुरू केल्या. या ग्रुपच्या एकूण ३७ कंपन्या आहेत. भारतातील पेटीएमसहीत जगातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत.

Leave a Comment