चुकूनही सोशल मीडियावर शेअर करु नका ही माहिती

आज सोशल मीडियावर सर्वचजण सक्रिय असतात. या फ्लॅटफॉर्मवर आपण आपली खाजगी माहिती शेअर करत असतो. मात्र या माहितीमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. तुमची खाजगी माहिती देखील लीक होऊ शकते व तुम्ही अडचणी सापडू शकता. सोशल मीडियावर कोणती माहिती शेअर करू नये, याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

जन्म तारीख –

सोशल मीडियावर जन्म तारीख कधीही शेअर करू नये. यामुळे तुमची खाजगी माहिती चोरी होऊ शकते. अनेक युजर्सचे पासवर्ड हे जन्म तारीख देखील असते, त्यामुळे हॅकर्स खाजगी माहिती एकत्र करून तुमची फसवणूक करू शकतात.

Image Credited – Amarujala

मोबाईल नंबर –

अनेकजण सोशल मीडियावर मित्र व नातेवाईकांशी कनेक्ट होता यावे यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर शेअर करतात. मात्र हॅकर्स या नंबरचा चुकीचा वापर करुन तुम्हाला फसवू शकतात.

Image Credited – Amarujala

घराचा पत्ता –

सोशल मीडिया साइट्सवर तुमच्या घराचा पत्ता शेअर करू नये. कारण यामुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे सुरक्षेसाठी घरचा पत्ता शेअर करू नये.

Image Credited – Amarujala

बँक आणि एटीएम कार्डची माहिती –

अनेकदा युजर्स बँक आणि एटीएमची माहिती देखील सोशल मीडियावर मित्रांशी शेअर करतात. हॅकर्स युजर्सच्या या चुकीचा फायदा उचलून बँक खाते रिकामे करतात. याशिवाय सोशल मीडियावर पॅन कार्ड, आधार कार्ड यासंबंधित माहिती देखील अजिबात शेअर करू नये.

Leave a Comment