या रेस्टॉरंटमध्ये बोलण्यास मनाई


फोटो सौजन्य न्यूज टुडे
कॉफी शॉप, रेस्टॉरंट, हॉटेल या जश्या खाण्याच्या जागा तशाच मनसोक्त गप्पा मारण्याच्या जागा. पण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बोलायची बंदी असेल तर? तर काही नाही, न बोलताही तुम्ही तुम्हाला हवी ती ऑर्डर देऊ शकता. असे एक रेस्टॉरंट चीनच्या ग्वांग्झू मध्ये काही दिवसापूर्वी सुरु झाले आहे. विशेष म्हणजे ते लोकप्रिय कॉफी शॉप स्टार बक्स ने सुरु केले असून त्याचे नाव सायलेंट रेस्टॉरंट असे आहे.

येथे ग्राहकाला जे मागवायचे असेल ते हाताच्या खुणा करून, मेन्यू कार्ड वरील नंबर दाखवून मागविता येते आणि काही मिनिटात तुम्ही मागविलेले पदार्थ तुमच्या पुढ्यात येतात. समजा एखादा ग्राहक नक्की काय मागवतोय याचा उलगडा होत नसेल तर तुम्ही नोटपॅडवर लिहून दाखवू शकता तसेच ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी यांच्यात डिजिटल संवाद सुविधा मिळू शकते.


या रेस्टॉरंटच्या भिंतींवर संकेतिक भाषा, चिन्हे, इंडिकेटर आहेत त्यामुळे बहुतेक वेळा ग्राहकाला काय हवेय ते वेटरला सहज समजते. ज्या लोकांना बोलता येत नाही, त्यांची भाषा ग्राहकांना समजावी त्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. सायलेंट रेस्टॉरंटमध्ये ३० कर्मचारी असून त्यातील १४ जणांना ऐकायला येत नाही.

Leave a Comment