कोरोना विषाणूमुळे चर्चेत आलेले वुहान


चीन मध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूचा उद्रेक ज्या वुहान शहरात झाला ते शहर अचानक जगभर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. मात्र आजपर्यंत या शहराबद्दल फारशी माहिती लोकांसमोर आलेली नाही. तर कसे आहे हे वुहान शहर?

सध्याची परिस्थिती अशी आहे की हे शहर येण्याजाण्यासाठी सात दिवस बंद केले गेले आहे. म्हणजे या शहरात आत्ता कुणी जाऊ शकत नाही आणि शहरातून कुणी बाहेर पडू शकत नाही. लाखो लोक आपापल्या घरातून बंदी बनले आहेत. वास्तविक चीनमधले गेल्या दहा वर्षात अतिशय वेगाने विकसित झालेले हे शहर. या शहराची लोकसंख्या ११ लाख असून ती मेगा सिटी आहे. शांघाय पासून ८०० किमीवर असलेल्या या शहरात हायस्पीड ट्रेननी चार तासात पोहोचता येते.

शहराचा परिसर प्रचंड मोठा आहे आणि हे शहर केंद्रीय शहर म्हणून विकसित केले गेले आहे. ते चीनचे महत्वाचे ट्रान्सपोर्ट हब आहे आणि चीनच्या अन्य ९ राज्यांशी जोडलेले आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ अतिशय मोठा असून जगातील पाच महाद्वीप त्याच्याशी विमानसेवेने जोडली गेली आहेत. येथून २० देशात १०९ शहरात फ्लाईट जातात.

सध्या चीनमध्ये नववर्षाच्या सुट्ट्या आहेत. वुहान मध्ये सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी विविध विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. येथे प्रचंड मोठे मटन मार्केट असून तेथे ११२ विविध प्राण्यांचे मांस विकले जाते. त्यात सापापासून ते वटवाघूळ, उंट, मोर तसेच अनेक प्रकारचे किडे, कीटक विकले जातात.

Leave a Comment