गुजराथ करणार हौ डी ट्रम्प !


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी मध्ये भारत भेटीवर येणार असल्याचे गुजराथचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिल्ली मधील रॅलीमध्ये सांगितले. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर हौ डी ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते असे संकेत दिले असून ट्रम्प साबरमती रिव्हर फ्रंटला पंतप्रधान मोदी यांच्यासह भेट देतील असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान भारत भेटीवर येतील. या दौऱ्यात जम्मू काश्मीर संदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही तर दोन्ही देशातील व्यापार हाच चर्चेचा मुख्य विषय असेल. अमेरिकन सरकारमधील उच्चपदस्थ तसेच वाणिज्य मंत्री ट्रम्प यांच्यासोबत येतील असेही सांगितले जात आहे.

२४ फेब्रुवारी ते ३० मार्च या काळात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट् मानवाधिकार आयोगाचे बैठक होत असून यात पाकिस्तान एनसीआर, एनपीआरचा बहाणा करून मोदी शासनात भारतात मुस्लीम असुरक्षित असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न करू शकतो त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या भारत भेटीला विशेष महत्व दिले जात आहे. मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना ह्युस्टन शहरात ज्याप्रमाणे भव्य हौ डी मोदी कार्यक्रम झाला त्याच धर्तीवर मोटेरा स्टेडियम मध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम होईल असा अंदाज आहे.

या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार प्रेक्षकांची आहे. साबरमती नदी ही जगातील सर्वात स्वच्छ नदी म्हटली जाते. तेथेही ट्रम्प मोदी यांच्यासह भेट देतील. न्युयॉर्क टाईम्सच्या बातमीत ट्रम्प यांच्या भारतात राहण्याच्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करण्यासाठी अमेरिकन पथक भारतात येत आहे. ट्रम्प ताजमहालला भेट देतील आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि बराक ओबामा ज्या हॉटेल मध्ये राहिले होते तेथेच ट्रम्प यांचीही व्यवस्था केली जाईल.

Leave a Comment