इराणकडे आहे हत्यारी डॉल्फिन ब्रिगेड


फोटो सौजन्य टास्कपर्पज
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला असतानाच डेली स्टार आणि मिलिटरी डॉट कॉम या दोन जगप्रसिद्ध वेबसाईट इराण मध्ये हत्यारी डॉल्फिनची भलीमोठी ब्रिगेड असल्याची माहिती देत आहेत. इराणी नौसेनेकडे असे विशेष प्रशिक्षित १ हजाराहून अधिक डॉल्फिन असून हे डॉल्फिन अतिशय धोकादायक आहेत. ते स्फोटके वाहून नेऊ शकतात आणि शत्रूची जहाजे, पाणबुड्या याना अजिबात पत्ता लागू न देता त्यांच्या जवळ जाऊन स्फोट घडवू शकतात. गेली १७ वर्षे ही किलर डॉल्फिन ब्रिगेड इराण नौसेनेसाठी काम करते आहे.


अमेरिकी सैन्य तुकडीबरोबर झालेल्या एका युद्ध सराव शिबिरात या ब्रिगेडचे दर्शन झाले होते असे सांगतात. डेली स्टार आणि मिलिटरी डॉट कॉमच्या रिपोर्ट प्रमाणे सोविएत संघाने प्रथम डॉल्फिन सेना प्रकल्प सुरु केला होता पण सोविएतचे विभाजन झाल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट राहिला. मात्र डॉल्फिनना प्रशिक्षण देणारया बोरीस जुरीद याने हे डॉल्फिन घेऊन सर्कस सुरु केली. ती कालांतराने बंद पडली तेव्हा त्याने हे डॉल्फिन विकायला काढले. त्यात इराणने औसुक्य दाखविले आणि बोरीसलाच या डॉल्फिनना ट्रेंड करण्याचे काम दिले. त्याने डॉल्फिन ना अतिशय कडक प्रशिक्षण देऊन त्यांना धोकादायक बनविले.

मिलिटरी डॉट कॉमच्या माहितीनुसार १९९१ मध्ये सोविएतचे तुकडे पडल्यावर क्रिमीया मध्ये या डॉल्फिनना आक्रमण करण्याचे शिक्षण दिले गेले. शत्रूची जहाजे, पाणबुड्या हे डॉल्फिन पाण्याच्या आत नुसत्या आवाजावरून ओळखतात आणि त्यांच्यावर गुपचूप आक्रमण करून त्यांचा नाश करतात. डॉल्फिनचे सरासरी आयुष्य ५० वर्षाचे असते आणि हे मासे अतिशय बुद्धिमान समजले जातात. हेरगिरीसाठी त्यांचा वापर अनेक राष्ट्रांनी केला आहे.

Leave a Comment