धोनीला मागे टाकत विराटने नोंदवला खास विक्रम


हेमिल्टन – भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. भारताकडून कर्णधाराच्या रुपात विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वांधिक धावा आपल्या नावे केल्या आहेत. विराटने या प्रकारात धोनीला मागे टाकले आहे. विराट आता क्रिकेटच्या सर्व प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता त्याच्या पुढे या प्रकारात दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी आणि न्यूझीलंडचा केन विल्यिमसन आहे. हेमिल्टनच्या सेडन पार्कवर तिसऱ्या टी-२० सामन्यात विराटने २७ चेंडूवर ३८ धावांची खेळी केली.

कर्णधार म्हणून आता विराटच्या खात्यात ११२६ धावा झाल्या आहेत. कर्णधार म्हणून डुप्लेसीने १२७३ टी-२० धावा केल्या आहे. तर विल्यिमसनने कर्णधार म्हणून ११४८ धावा केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या खात्यात १११२ धावा आहेत. विराटने न्यूझीलंडविरोधात हेमिल्टनमध्ये २५ धावा करताच त्याने धोनीला मागे टाकले. विराटने कर्णधार म्हणून आपला ३६ वा सामना खेळला. यादरम्यान त्याने ३७.०६ च्या सरासरी आणि १२२.६० स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने आठवेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

Leave a Comment