ट्रूकॉलरद्वारे फोन येण्याआधीच मिळणार कॉलरची माहिती

नंबर ट्रॅकिंग अ‍ॅप ट्रूकॉलरने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. या फीचरद्वारे ट्रूकॉलर तुम्हाला फोनची रिंग वाजण्याआधीच कोणाचा फोन येणार आहे, याची माहिती देईल.

ट्रूकॉलरने सांगितले की, रिंग वाजण्याच्या आधी कॉलरची माहिती मिळाल्याने स्पॅम थांबेल व युजर्स आपल्या सोयीनुसार फोन उचलू शकतील. अनेक मार्केटिंग कंपन्या ऑटोमॅटिक कॉलिंगचा वापर करतात. ज्यामुळे युजर्सला अनेक फोन येत असतात. यापासून वाचण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरेल.

हे फीचर आधी केवळ आयफोन युजर्ससाठीच होते, मात्र आता आता अँड्राईड युजर्ससाठी देखील हे फीचर जारी करण्यात आलेले आहे.

ट्रूकॉलरचे हे फीचर वाय-फाय अथवा मोबाईल डेटाद्वारे काम करते. एखाद्या नंबरवरून तुम्हाला फोन येणार असेल, तर ट्रूकॉलर तुम्हाला इंटरनेटच्या मदतीने त्याचे आधीच नॉटिफिकेशन देईल.

ट्रूकॉलरने मागील वर्षीच आपल्या युजर्सला वॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉलिंग सुविधा दिली आहे. ट्रूकॉलरने या फीचरला ट्रूकॉलर वॉइस असे नाव दिले आहे. युजर्स ट्रूकॉलरद्वारे वाय-फाय अथवा मोबाईल इंटरनेटद्वारे जगभरात मोफत वॉइस कॉलिंग करू शकतील.

Leave a Comment