‘या’ बापाने थंडीपासून मुलीला वाचवण्यासाठी जाळले होते १३ कोटी रूपये


आजच्या घडीला जगभरात अब्जोपतींची कमी नाही आहे. तेवढेच मोठे त्यांचे शौक देखील असतात. एवढा सगळा पैसा घेऊन आता ते जाणार तरी कुठे. ते त्यासाठी वेगवेगळ्याप्रकारे खर्च करतात आणि महागड्या वस्तू घेतात. पण आम्ही आज तुम्हाला अशा एका श्रीमंत व्यक्तीचा किस्सा सांगणार आहोत, जो ऎकून तुम्ही देखील थक्क व्हाल. आपण कमावलेल्या करोडो रूपयांना कोणताही व्यक्ती आग लावेल का? या प्रश्नाचे उत्तर चक्क कुणीही नाही, असेच देणार. पण १३ कोटी रूपये जाळून एका व्यक्तीने राख केले. मात्र तितकच गंभीर त्या मागचे कारण देखील आहे. कोलंबिया येथील हे प्रकरण आहे. या अब्जोपती व्यक्तीच्या मुलीला ऐवढी थंडी लागत होती तिला गरमी मिळावी म्हणून त्याने चक्क १३ कोटी रूपये जाळून राख केले होते.

या व्यक्तीचे नाव पॅब्लो एस्कोबार गॅविरिया असे असून ही माहिती त्याने एका मुलाखतीत दिली होती. हा व्यक्ती एक मोठा डॉन होता. त्याने सांगितले की, तो पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याचा परिवाराला घेऊन एका थंड्या डॊंगराळ भागात बरेच दिवस लपला होता. त्याच्या मुलीला एका रात्री खूप थंडी वाजायला लागल्यामुळे तिच्या शरीरातील तापमान कमी होत गेले. त्याने या कारणाने २० लाख डॉलर म्हणजे १३ कोटी रूपये जाळले, जेणेकरून त्याच्या मुलीला गरमी मिळेल.

कोकेन किंग म्हणून हा व्यक्ती ओळखला जायचा. त्याची प्रत्येक आठवड्याची कमाई ४२ कोटी डॉलर म्हणजे २८१४ कोटी ऐवढी असायची. या डॉनच्या मुलीचीच तब्येत आता बिघडली म्हटल्यावर १३ कोटीची मुलीपुढे काहीच किंमत नाही. जगातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात यशस्वी गुन्हेगार पॅब्लो हा मानला जातो. कारण फोर्ब्स पत्रिकाने एस्कोबारला वर्ष १९८९ मध्ये जगातला सातवा सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित केले होते.

त्याचबरोबर त्याने १९८६ मध्ये कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. देशावरच १० बिलियन डॉलरचे कर्ज चुकवण्याचीही त्याने ऑफर दिली होती. त्यानंतर रॉबिन हुड म्हटले जाऊ लागले. त्यामुळे हा गुन्हे विश्वातला सर्वात मोठा गुन्हेगार मानला जातो.

Leave a Comment