सायना नेहवाल करणार भाजपमध्ये प्रवेश


नवी दिल्ली – भारताची फुलराणी अशी ओळख असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा देखील ती प्रचार करणार आहे. हरियाणाची रहिवाशी असलेली सायना नेहवाल जर प्रचारात उतरली तर त्याच्या नक्कीच भाजपला फायदा होईल.

सायना भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीमध्ये सध्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. येथे अनेक धुरंधर नेते प्रचारात व्यस्त आहेत. त्यातच आता सायना नेहवालच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच फायदा होईल त्याबरोबर ती पक्षाची स्टार प्रचारक असणार आहे.

Leave a Comment