बीएस6 इंजिनसह लोकप्रिय एमपीव्ही ‘रेनॉल्ट ट्रायबर’ लाँच

रेनॉल्ट इंडियाने आपली सर्वाधिक लोकप्रिय एमपीव्ही रेनोल्ट ट्रायबरला नवीन इंजिनसह लाँच केले आहे. ट्रायबरला बीएस6 मानक इंजिनसह लाँच करण्यात आलेले आहे. कंपनीने याच्या स्पेसिफिकेशनमध्ये काहीही बदल केले नसून, केवळ किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

बीएस6 इंजिन रेनो ट्रायबरची सुरुवाती एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. कंपनीने नवीन ट्रायबरमध्ये 4 हजार ते 29 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कंपनी लवकरच एएमटी व्हेरिएंट, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल यूनिट देखील लाँच करणार आहे.

Image Credited – NDTV

बीएस6 इंजिनसह येणाऱ्या ट्रायबरमध्ये 1.0 लीटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. जे 75 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसोबत येते.

कंपनीने बीएस6 इंजिनसह ट्रायबरचे 4 व्हेरिएंट लाँच केले आहेत. यामध्ये ट्रायबर RXE (4.99 लाख रुपये), ट्रायबर RXS (5.74 लाख रुपये), ट्रायबर RXT (6.24 लाख रुपये) आणि ट्रायबर RXZ (6.78 लाख रुपये) व्हेरिएंटचा समावेश आहे.

 

Image Credited – gaadiwaadi

नवीन ट्रायबरमध्ये रॅपअराउंड हेडलॅम्प्स, सिल्वर स्कफ प्लेटसोबत ड्युअल टोन फ्रंट बंपर आणि डेटाइम रनिंग लाइट्स देण्यात आली आहे. ट्रायबरच्या बेस व मिड व्हेरिएंटमध्ये 14 इंचचे स्टील व्हिल्ज आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 15 इंच एलॉय व्हिल्ज मिळतील.

कारमध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड, अॅपल कार प्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट 8 इंच टचस्क्रीन इंफोटनेमेंट सिस्टम मिळेल. सोबतच 3 स्पोक स्टेअरिंग व्हिल आणि 3.5 इंच स्क्रीनसह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे.

Leave a Comment