कोण आहेत फळे विकून शाळा उभारणारे ‘पद्मश्री’ विजेते हारेकाला हजाब्बा

कर्नाटक येथील संत्री विक्रेते हारेकाला हजाब्बा यांना 2020 चा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री जाहीर झाला आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांच्यानुसार, 68 वर्षीय हारेकाला हजाब्बा यांना जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळाल्याची माहिती समजली, त्यावेळी ते रेशनच्या दुकानात रांगेत उभे होते.

दक्षिण कन्नडातील फळ विक्रेते हारेकाला दशकापासून मशीदमध्ये  न्यूपडापू येथील गरीब विद्यार्थ्यांनी शिकवत आहे. आपली स्वतःची कमाई देखील ते शाळेसाठी खर्च करत असल्याचे, कासवान यांनी सांगितले.

हारेकाला यांचे गाव न्यूपडापू येथे शाळा नव्हती. अखेर त्यांनी पैशांची बचत करून 2000 साली शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यावर त्यांनी कर्ज व स्वतः केलेल्या बचतीद्वारे शाळेसाठी जमीन देखील खरेदी केली.

हारेकाला यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही. मात्र एका परदेशी पर्यटकांसोबत झालेल्या चकमकीमुळे त्यांनी गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, परदेशी जोडपे मला संत्र्यांची किंमत विचारत होते. मात्र मला ते समजले नाही. प्रयत्न करून देखील तुलू आणि बेअरी या भाषांशिवाय मी काहीही बोलू शकलो नाही. त्यामुळे ते जोडपे तसेच निघून गेले. यामूळे मला खूप वाईट वाटले व माझ्या गावातील मुलांना तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागू नये असे वाटले. माझ्या लक्षात आले की संवादामुळे माणसाची प्रगती होऊ शकते व त्याचवेळी माणसे जोडली देखील जाऊ शकतात.

सरकार त्यांच्या गावात लवकरच कॉलेज देखील सुरू करेल अशी हारेकाला यांना आशा आहे.

Leave a Comment