रोमहर्षक सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा दमदार विजय


हेमिल्टन – हेमिल्टनमधील सेडॉन पार्कवर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेचा तिसरा सामना खेळवला गेला. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून त्याचबरोबर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार केन विल्यम्सनने घेतला. पण आजच्या सामन्यात शमीने कलाटणी देणारी विकेट घेतल्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सुपरओव्हर खेळण्यात आली. सुपरओव्हरमध्ये रोहित शर्माने तडकावलेल्या सलग दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर ‘सुपरहिट’ विजय मिळवला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारताला १८ धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या रोहित शर्माने लागोपाठ दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी रोहित शर्मा आणि के. एल. राहुल पहिल्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरले. रोहित शर्माने या सामन्याच्या सुरुवातीला दमदार फटकेबाजी केली. भारताने पाच षटकानंतर बिनबाद ४२ धाव्या केल्या. रोहित शर्माने २४ तर के.एल राहुलने १८ धावा केल्यानंतर रोहित शर्माने २३ चेंडूमध्ये आपले अर्धशतक झळकवले. रोहित आणि राहुलने सहा षटकांत ६९ धावांची भागीदारी केली. मग भारताला ८९ धावांवर पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज के. एल राहुल २७ धावांवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला फलंदाजी करण्यासाठी पाठविण्यात आले. दरम्यान भारताने देखील दहा षटकांत ९२ धावा केल्या.

६५ धावांवर सामन्यात दमदार फटकेबाजी करणारा रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रोहितच्या पाठोपाठ शिवम दुबेही बाद झाला. शिवम दुबेने अवघ्या सात चेंडूत तीन धावा केल्या. त्यानंतर मैदानात कर्णधार विराट आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी उतरले. श्रेयस अय्यर १७ धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने २७ चेंडूत ३७ धावांची खेळी करून झेलबाद झाला. भारताने २० षटकांत १७१ धावा करून न्यूझीलंडला विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले.

Leave a Comment