डेटिंग अ‍ॅप्समुळे असा येत आहे तुमच्या नात्यात दुरावा

काही वर्षांपुर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्याबद्दल असलेली प्रेमाची भावना सांगण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागत असे. एखाद्या व्यक्तीला मागणी घालणे व डेटसाठी विचारणे, यासाठी हिंमत लागत असे. मात्र सध्या डेटिंग अ‍ॅपमुळे या सर्व गोष्टी अगदी सहज-सोप्या झाल्या आहेत. तुमच्या बोटांद्वारे मोबाईलच्या स्क्रीनवर कोणाला होकार द्यायचा व कोणाला नकार हे आता ठरवता येते.

हे साधे वाटणारे डेटिंग अ‍ॅप मनुष्याच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. कारण हे अ‍ॅप एका व्यक्तीला त्याच्या आवडीच्या दुसऱ्या व्यक्तीला भेटण्यास मदत करतात. लोक एकमेकांशी फ्लर्ट करतात, संवाद साधतात, प्रेम करतात व काहीजण तर लग्न देखील करतात.

Image Credited – Amarujala

हे अ‍ॅप्स लोकेशन बेस्ड असतात, म्हणजेच तुमच्या जवळीलच व्यक्तीला शोधण्यास मदत करतात. भारतात टिंडर हे लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप आहे. या व्यतरिक्त बंबल, हॅप्पन, ट्रूली मेडली, ओके क्यूपिड, ग्राइंडर असे अनेक अ‍ॅप्स आहेत. हे अ‍ॅप मोफत देखील वापरता येतात. मात्र स्बस्क्रिप्शन घेतल्यावर मॅच मिळण्याची अधिक शक्यता असते, असा दावा केला जातो.

टिंडरमध्ये स्वाइपिंगचे टूल असते. तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीच्या फोटोला राइट स्वाइप आणि न आवडलेल्या व्यक्तीसाठी लेफ्ट स्वाइप करावे लागते. जर दोन्ही व्यक्तींनी राइट स्वाइप केले तर दोघेही एकमेंकाना आवडले असा अर्थ होतात. अर्थात मॅच होते. टिंडरनुसार, अधिकतर युजर हे 18 ते 30 वयोगटातील असतात. टिंडरचा दावा आहे की, जगभरात दर आठवड्याला 10 लाख डेट्स अ‍ॅपद्वारे होतात. तर आतापर्यंत 30 अब्ज मॅच झाले आहेत.

Image Credited – Amarujala

काहीजण केवळ शरीरसंबंधासाठी म्हणजेच हुकअप्ससाठी या अ‍ॅप्सचा वापर करतात. तर काहीजण केवळ मैत्रीसाठी हे अ‍ॅप्स वापरतात.

रिलेशनशीप तज्ञ निशा खन्ना यांच्यानुसार, आधी नात्यामध्ये महिलांना तडजोड करावी लागत असे. मात्र आता सर्व बदलले आहे. आता महिला आपल्या अधिकाराबद्दल अधिक सजग झाल्या आहेत. आता महिला सेक्शुअल इच्छांबद्दल बोलू लागल्या आहेत. आपल्या आवडी-निवडीबद्दल बोलू लागल्या आहेत. काही महिला लग्न न करता एकटे राहण्यास देखील पसंती देतात.

Image Credited – Amarujala

ऑनलाईन मार्केट रिसर्चर स्टेटिस्टानुसार, भारतात 2020 मध्ये 2 कोटी 25 लाख लोक डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. हा आकडा 2024 पर्यंत 2.64 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. अधिक चांगले मॅच मिळवण्यासाठी अनेकजण डेटिंग अ‍ॅप्सवर पैसे खर्च करतात. स्टेटिस्टानुसार 2020 मध्ये ऑनलाईन डेटिंग मार्केटची कमाई 6 कोटी 30 लाख अमेरिकन डॉलर एवढी आहे.

Image Credited – The Economic Times

डेटिंग अ‍ॅप्सबाबत तक्रारी देखील आहेत. अनेकजण यावर फेक प्रोफाईल बनवतात. ते आपले वय, फोटो, माहिती याबाबत खोटे सांगतात. अनेकदा या खोट्या माहितीतून गुन्हे देखील घडतात व शिक्षा होते.

अनेकदा काही जोडपी अ‍ॅप्सवर भेटल्यानंतर लग्न देखील करतात. मात्र यामुळे त्यांच्या मनात एकमेंकाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्यामुळे ते लग्नानंतर देखील खूष नसतात. अ‍ॅपवरून भेटल्याने दोघांना एकमेंकाच्या पुर्व आयुष्याबद्दल संशय निर्माण होत असतो. त्यामुळे लग्नानंतर देखील अनेकजण वेगळे होतात.

Leave a Comment