आता ‘गुगल पे’द्वारे फास्टॅग रिचार्ज शक्य

पेमेंट अ‍ॅप गुगल पे ने आपल्या फ्लॅटफॉर्मवर एक नवीन यूपीआय फीचर जोडले आहे. या फीचरद्वारे घरी बसल्या बसल्या फास्टॅग रिचार्ज करता येणार आहे. या फीचरद्वारे रिचार्ज संबंधित अधिक माहिती देखील मिळेल. रिचार्ज करण्यासाठी फास्टॅग कार्ड गुगल पे शी लिंक करावे लागेल.

गुगप पे वरून फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला दोन्ही अकाउंट लिंक करावे लागतील. गुगल पे उघडल्यानंतर फास्टॅग कॅटेगरी सर्च करा. येथे तुम्हाला बिल पेमेंट सेक्शन पर्याय दिसेल.

त्यानंतर रिचार्ज पर्याय निवडा व फास्टॅग जारी केलेली बँक निवडा. यानंतर गाडी नंबर टाकल्यानंतर पेमेंट विथ बँक अकाउंट पर्याय निवडा. हे केल्यावर तुमचे फास्टॅग रिचार्ज होईल. येथे तुम्ही फास्टॅग बॅलेंस देखील तपासू शकता.

15 जानेवारीपर्यं सरकारने आतापर्यंत 70 लाखांपेक्षा अधिक फास्टॅग जारी केले आहेत.

Leave a Comment