गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली : आता 24 आठवड्यांनंतरही देशात गर्भपात करता येणार आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने गर्भपाताच्या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. त्यासाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, 1971 (Medical Termination of Pregnancy Act, 1971) मध्ये बदल करण्यात येणार आहे. गर्भपाताची 20 आठवड्यांची मुदत सुधारित गर्भपात कायद्यानुसार 24 आठवडे केली जाणार आहे. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केले जाणार आहे.

भारतात सध्या कायद्यानुसार 20 आठवडे गर्भपात करण्याचा कालावधी आहे. 20 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही आणि तो गुन्हा म्हणून नोंदवला जातो. 20 आठवडे गर्भपात करण्याचा कालावधी असल्यामुळे ग्रामीण भागात असुरक्षित गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. काही गुंतागुंत गरोदरपणात नंतरच्या काळात निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण हा निर्णय घेण्याअगोदर डॉक्टरांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

Leave a Comment