हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम 5 फ्रिज

जर तुम्ही देखील 15 हजारांपेक्षा कमी किंमत फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला असेच काही सर्वोत्तम फ्रिज सांगणार आहोत. 185 लीटर ते 200 लीटर पर्यंतचे फ्रीज देखील यात आहेत, जे छोट्या कुटुंबाला उपयोगी ठरतात.

Image Credited – Amarujala

व्हर्लपूल 190 लीटर 3 स्टार (2019) –

व्हर्लपूलने हा फ्रिज खास मध्यम वर्गासाठी सादर केला आहे. या फ्रिजची किंमत 12,990 रुपये आहे. ग्राहकांना यात स्टेबलाइजर फ्री ऑपरेशन, मॅन्युअल डीफ्रॉस्टिंग आणि रिमूव्हेबल एंटी-बॅक्टेरिया गॅसकेट सारखे फीचर्स मिळतील. सोबतच अधिक बॉटल स्टोरेज देखील मिळेल.

Image Credited – Amarujala

गोदरेज 190 लीटर 3 स्टार (2019) –

या फ्रिजची किंमत 11,790 रुपये असून, या फ्रिजवर तुम्हाला 1 वर्ष आणि कमप्रेशरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.

Image Credited – Amarujala

एलजी 3 स्टार (2019) –

एलजीचा हा फ्रिज आकर्षक आहे. कंपनीने या फ्रिजवर 1 वर्ष आणि कमप्रेशरवर 5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. ग्राहकांना फ्रिजसोबत एक कव्हर देखील मिळेल. फ्रिजमध्ये फास्ट आइस मेकिंगचे फीचर देखील आहे. या फ्रिजची किंमत 14,490 रुपये आहे.

Image Credited – Amarujala

हेइर 195 लीटर 5 स्टार (2019) –

या फ्रिजची किंमत 12,800 रुपये आहे. या फ्रिजमध्ये स्टेबलाइजर फ्री ऑपरेशन, भाजीसाठी बॉक्स आणि एलईडी रेफ लाइड मिळेल. सोबतच या फ्रिजवर 1 वर्ष आणि कंप्रेशरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल.

Image Credited – Amarujala

सॅमसंग 2012 लीटर 3 स्टार (2019) –

सॅमसंगचा हा फ्रिज छोट्या कुटुंबासाठी अगदी योग्य आहे. या फ्रिजवर 1 वर्ष आणि कंप्रेशरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल. या फ्रिजची किंमत 14,990 रुपये आहे.

हे सर्व फ्रिज ऑनलाईन शॉपिंग साइट आणि ऑफलाइन स्टोरवरून देखील खरेदी करता येईल.

Leave a Comment