भारतीय वंशाच्या व्यक्तीला सापडला तब्बल 5 हजार वर्ष जुना कुत्र्याचा स्टॅच्यू

ब्रिटनच्या सोमरसेट येथे राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या रत्न व्यापाऱ्याच्या मुलाला घरातील एका ड्रॉव्हरमध्ये 5 हजार वर्ष जुना कुत्र्याचा स्टॅच्यू सापडला आहे. या स्टॅच्युची किंमत जवळपास 27 कोटी रुपये आहे. हा स्टॅच्यू त्या व्यक्तीच्या वडिलांकडे होता. ते 1960 मध्ये ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. 2002 मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर 66 वर्षीय अल्फ्रेड कोरेया याबद्दल विसरून गेले होते. अचानक गळ्यातील रत्नजडित लॉकेट शोधत असताना, त्यांना हा स्टॅच्यू सापडला.

अल्फ्रेड यांनी सांगितले की, हा कुत्र्याचा स्टॅच्यू सौभाग्याने मिळाला आहे. हा कोठे होता व याची काय किंमत आहे हे माहिती नव्हते. हा स्टॅच्यू चीनमध्ये पाषाण युगाच्या काळात हकीक (एक प्रकारचे रत्न) पासून बनला आहे.

आशियाई कला विशेषज्ञ अलेक्झेंडर क्लमेंट यांच्यानुसार, हा स्टॅच्यू 4 ते 5 हजार वर्ष जुना आहे. त्यांनीच हा स्टॅच्यू हकीकपासून बनल्याचा दावा केला आहे. लंडन स्कूल ऑफ ऑरिएंटल अँड एशियन स्टडीजने देखील हा स्टॅच्यू दक्षिण चीनमध्ये बनल्याचा दावा केला आहे.

अल्फ्रेड यांचे म्हणणे आहे की, हा स्टॅच्यू याच्या खऱ्या मालकासोबत जमिनीत दफन करण्यात आला असावा, नंतर चोरांनी खोदकामानंतर त्यांच्या वडिलांना विकला असावा.

Leave a Comment