स्टार प्रचारकांच्या यादीतून अनुराग ठाकूरांचे नाव हटवा – निवडणूक आयोग


नवी दिल्ली – राज्य निवडणूक आयोगाने भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचे आदेश दिले आहे. अनुराग ठाकूर व परवेश साहिब सिंग या दोघांनाही स्टार प्रचारकाच्या यादीतून हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आले आहे.

या दोघांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांच्या वक्तव्यांवरुन प्रचंड वाद विवादही झाले होते. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित घटनेचा अहवालही मागवला होता. तर तुम्ही सांगाल तिथे मी येतो मला गोळी घाला अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी व्यक्त केली होती.
Election Commission orders removal of Anurag Thakur’s list from Star campaigners list

Leave a Comment