रतन टाटा याना टायकॉन २०२० लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड


मुंबईत मंगळावरी यंदाचा टायकॉन अॅवॉर्ड सोहळा संपन्न झाला त्यात टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा याना टायकॉन २०२० लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हे अॅवॉर्ड इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते रतन टाटा याना प्रदान केले गेले. त्यावेळी ८२ वर्षीय टाटा यांच्या पायाला हात लावून ७३ वर्षीय नारायण मूर्ती यांनी नमस्कार केला.

या वेळी बोलताना रतन टाटा म्हणाले, ते स्वतः स्टार्टअप कंपन्यात गुंतवणूक करत आहेत. मात्र ज्या स्टार्टअप कंपन्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून गायब होऊ पाहत आहेत त्यांना दुसरी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. जुने व्यवसाय हळूहळू कमजोर होत जाणार आहेत आणि त्यांची जागा इनोव्हेटिव्ह कंपन्या घेतील. या कंपन्याचे युवा संस्थापक बिझिनेस जगतात भविष्यातील लीडर असतील.

विशेष म्हणजे टाटानी दिलेला इशारा अश्यावेळी आला आहे जेव्हा अनेक स्टार्टअप कंपन्यांवर कॅश बर्न आरोप होऊ लागले आहेत. फ्लिपकार्ट हे त्याचे उदाहरण देता येईल. टाटा म्हणाले व्यवसायात नैतिकता हवी. एका रात्रीत प्रसिद्धी मिळविण्याच्या मोहापासून दूर राहिले पाहिजे.

नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना पेन्शन फंड आणि बँकानी भारतीय स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली पहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Comment