बिझिनेस जगतातील पाच बड्या कंपन्यांचा कारभार या महिलांचा हाती


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कामगिरी पार पडताना दिसत आहेत त्याला बिझिनेस जगही अपवाद राहिलेले नाही. जगातील पाच बलाढ्य कंपन्यांचा कारभार अश्याच पॉवरफुल महिलांच्या हाती असून त्यांची टाईम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत नोंद घेतली आहे. विशेष म्हणजे त्यातील तीन भारतीय वंशाच्या आहेत.

बायोकॉन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुजुमदार याना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण सन्मानाने गौरविले आहे. त्या या कंपनीची धुरा १९८७ पासून सांभाळीत असून आज या कंपनीची मार्केट कॅप ३४६४४ कोटी आहे. तसेच आयटी कंपनी एचसीएलच्या एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर व सीईओ रोशनी नडार यांचाही फोर्ब्सच्या २०१९ च्या वर्ल्ड मोस्ट १०० पॉवरफुल महिला यादीत समावेश केला गेला आहे. २०१९ मध्ये त्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला म्हणूनही निवडल्या गेल्या होत्या. आज एचसीएलची मार्केट कॅप १.६३ लाख कोटी इतकी आहे.


तिसऱ्या आहेत पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी. त्यांचा अनेक वर्षे सलगपणे जगातील पॉवरफुल महिलांच्या यादीत समावेश राहिला असून त्या २०१९ पासून अमेझॉनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये सामील आहेत.


जर्मन सोफ्टवेअर व क्लाउड कॉम्प्युटिंग सॅपच्या एग्झिक्युटिव्ह ऑफिसर जेनिफर मोर्गन यांचाही या यादीत समावेश असून ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे. विशेष म्हणजे सॅप बोर्डवर सामील झालेल्या त्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत. आयबीएम या बलाढ्य कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ गिनी रॉनेटी या २०१२ पासून या पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्या कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ आहेत.

Leave a Comment