कोरोना विषाणू प्रतिकारासाठी तारा मंत्राचा जप करा- दलाई लामा


फोटो सौजन्य दिनमलार
तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी धोकादायक कोरोना विषाणू पासून बचावासाठी त्यांच्या अनुयायांना मंत्रोच्चाराचा सल्ला दिला आहे. या विषाणूच्या प्रतिकारासाठी तारा मंत्र जप करा असे दलाई लामांचे सांगणे आहे. चीन मध्ये वेगाने पसरत असलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूसाठी आता भारतातही दक्षतेचा इशारा दिला गेला आहे कारण या विषाणूवर अद्याप ठोस उपाययोजना सापडलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार चीन मध्ये या विषाणूमुळे आत्तापर्यंत १०६ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना त्याची लागण झाली आहे. या परिस्थितीत अनेक तिबेटी भाविकांनी दलाई लामा याना फेसबुकवरून या संदर्भात काही सल्ला द्यावा अशी विनंती केली होती. त्यावर दलाई लामांनी बौद्ध भिक्षु आणि अन्य भाविकांना तारा मंत्राचा पाठ करावा असे सुचविले आहे. हा पाठ करोनाचा प्रसार रोखण्यास समर्थ असून शांत चित्ताने भाविकांनी ‘ ओम तारे तुत्तारे तुरे स्वाहा’ हा मंत्र जपावा असे सांगताना त्यांनी त्यासाठी व्हॉइस क्लिप शेअर केली आहे.

Leave a Comment