‘आय लव्ह केजरीवाल’ स्टिकरमुळे रिक्षाचालकाचे फाडले चलान

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. याच दरम्यान दिल्लीतील एका रिक्षाचालकाला ‘आय लव्ह केजरीवाल’ स्टिकर लावल्याने 10 हजार रुपयांचे चलान कापण्यात आले होते. या प्रकरणात रिक्षाचालकाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

एका रिक्षा चालकाने न्यायालयात याचिका दाखल केली की, रिक्षावर आय लव्ह केजरीवाल स्टिकर लावल्यानंतर दिल्लीच्या वाहतूक पोलिसांनी 10 हजार रुपयांचे चलान फाडले. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे.

सुनावणीमध्ये वाहतूक पोलिसांना सांगावे लागेल की, कोणत्या नियमाच्या आधारे हे चलान फाडण्यात आले.

Leave a Comment