आता ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये बिअर ग्रिल्ससोबत झळकणार सुपरस्टार रजनीकांत


आपल्या चित्रपटातून आणि अनोख्या अंदाजातून सुपरस्टार रजनीकांत यांनी कोट्यावधी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावणारे रजनीकांत आता लवकरच अॅडव्हेंचरच्या जगात पाऊल ठेवत आहे. लवकरच “मॅन वर्सेज वाइल्ड” या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत रजनीकांत दिसणार आहेत. बांदीपूरच्या जंगलात रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सचे हे अॅडव्हेंचर होईल.

बेअर ग्रिल्ससोबत सुपरस्टार रजनीकांत यांच्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मॅन वर्सेज वाइल्ड”मध्ये अॅडव्हेंचर केले आहे. मोदी मागील वर्षी 12 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या मॅन वर्सेज वाइल्डच्या एपिसोडमध्ये बेअरसोबत उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट जंगलात गेले होते. त्या दोघांचा तो एपिसोड खूप चर्चेत आला होता. बिअरने मॅन वर्सेज वाइल्ड शोदरम्यान पंतप्रधानांना भाला दिला, तेव्हा मोदी म्हणाले, कोणाविरोधात हिंसा करणे माझ्या संस्कारात बसत नाही. बिअर ग्रिल्ससोबत यापूर्वी अमेरिकेचे पंतप्रधान बराक ओबामा यांनीदेखील भाग घेतला आहे. त्याशिवाय हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बिअरसोबत अॅडव्हेंचर केले आहे.

Leave a Comment