स्लमडॉग मिलिनेयरमधील बालकलाकार पुन्हा हालाखीच्या परिस्थितीत

2008 मध्ये हॉलिवुड दिग्दर्शक डॅनी बॉयल यांचा चित्रपट ‘स्लमडॉग मिलिनेयर’ने ऑस्करमध्ये बाजी मारली होती. या पुरस्करामध्ये एका लहान कलाकाराने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. या मुलाचे नाव अझहरुद्दीन इस्माइल. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या अझहरुद्दीनने या चित्रपटात छोट्या सलीमची भूमिका साकारली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे नाव कमवणाऱ्या या कलाकाराला दिग्दर्शकाने एक फ्लॅट देखील घेऊन दिला होता.

मात्र 12 वर्षानंतर अझहरुद्दीन पुन्हा एकदा आपल्या झोपडीच्या जगात परतला आहे. केवळ अझहरच नाही तर या चित्रपटात लतिकाचा लहानपणीची भूमिका साकारणारी रुबीना अली कुरेशी देखील झोपडपट्टीत परतली आहे.

Image Credited – News18

स्लनडॉग मिलिनेयरच्या यशानंतर दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी या कलाकारांच्या मदतीसाठी ‘जय हो’ नावाने ट्रस्ट सुरु केली होती. याद्वारे त्यांना फ्लॅटचा मासिक हफ्ता देखील मिळत असे. मात्र अझहरुद्दीनच्या कुटुंबाने हा फ्लॅट विकला आहे. अझहरुद्दीन आता 21 वर्षांचा झाला आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्या कुटुंबाने सांताक्रुझ येथील 250 स्केअर फूट घर विकून पुन्हा बांद्रा येथील गरीब नगर येथील आपल्या झोपडीत परतले आहेत. हे घर त्यांनी 49 लाखांना विकले.

झोपडीत परतल्यापासून अझहरुद्दीन अनेकदा आजारी देखील पडला असून, त्याची आई त्याला परत गावाला घेऊन गेली आहे. त्याने सांगितले की, आता स्टारडम संपला आहे. आता मला माझे कुटुंब चालवण्यासाठी काम करावे लागते. मी भलेही झोपडीत जन्माला आलो असेल, मात्र मला येथे रहायचे नाही. आर्थिक तंगीमुळे त्याने घर विकल्याचे देखील सांगितले.

News Credited – News18

अझहरुद्दीनला दिलेला फ्लॅट तो 18 वर्षांचा होईपर्यंत ट्रस्टच्या नावावर होता. रुबीनाला देखील बांद्रा येथे ट्रस्टकडून फ्लॅट देण्यात आला होता. रुबीनाने फ्लॅट विकला नसला तरी ती आपल्या आईबरोबर नालासोपारा येथील झोपडीत परतली आहे. तिच्या बांद्राच्या फ्लॅटमध्ये तिच्या वडिलांची दुसरी पत्नी व 5 मुले सोबत राहत आहेत.

रुबीनाने सांगितले की, मी 4 वर्ष या घरात राहिले. मात्र 8 लोक सोबत राहणे अवघड होते. म्हणून मी घर सोडले. रुबीनाने मेकअपचा कोर्स केला असून, ती सध्या एका मेकअप स्टुडिओमध्ये काम करते.

Leave a Comment