धक्कादायक! जोडीदाराला फसवून आठ लाख विवाहित लोक डेटिंग अॅप्सवर


मुंबई – डेटिंग या नव्याने आलेल्या संकल्पनेबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेलच याबद्दल काडीमात्र शंका नाही. सध्याच्या डिजिटल युगात डेटिंग अॅप्सचा भडीमार होत आहे. दोन लोक या अ‍ॅप्सद्वारे एकमेकांना भेटतात. त्यामागे प्रेम, सेक्स, रिलेशनशिप अशा अनेक गरजा असतात.

भारतातही अशी अनेक अॅप्स सध्या लोकप्रिय होत आहेत. पण सध्या याबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा समोर येत आहे. डेटिंगविषयी एक सर्वेक्षण भारतात करण्यात आले. जे सत्य या सर्वेक्षणात समोर आले ते धक्कादायक होते. अविवाहित लोकांव्यतिरिक्त, विवाहित लोकदेखील या डेटिंग अॅपचा वापर करत असून याचा अर्थ असा की विवाहित लोक आपल्या लग्नाव्यतिरिक्त बाहेर नाती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सर्वेक्षणात जे समोर आलेले आहे त्यानुसार, डेटिंग अ‍ॅपचा सुमारे आठ लाख विवाहित लोकांनी वापर करून आपल्या जोडीदाराची फसवणूक केली आहे. अशा डेटिंग अॅपवर नोंदणी करणार्‍यांच्या यादीत बंगळुरु अव्वलस्थानी आहेत. डेटिंग अ‍ॅप हे लग्नानंतर संबंध शोधणार्‍यांना एक स्वतंत्र व्यासपीठ प्रदान करते. म्हणूनच डेटिंग अॅपवर नोंदणी करणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे.

अ‍ॅपच्या दैनिक वर्गणीत 2020 च्या पहिल्या आठवड्यात 300% वाढ दिसून आली. तर नोव्हेंबर, 2019 मध्ये बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा अशी शहरे डेटिंग अ‍ॅप्सचा सर्वाधिक वापर करत असल्याचे आढळले आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सध्या 567% च्या वाढीसह डेटिंग अॅप लोकप्रिय होत आहे. आकडेवारीनुसार, आठ लाख विवाहित लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत. हाच ट्रेंड जानेवारी 2019 मध्ये दिसला होता. गेल्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, लोक दररोज 295% दराने अ‍ॅपवर सदस्यता घेत होते.

Leave a Comment