ही खास बॅटरी करणार ह्रदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांना एका विशेष प्रकारच्या प्लास्टिक पॉलिमरद्वारे एक सॉफ्ट (मऊ) आणि स्ट्रेचेबल (ताणता येईल असे) बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी पारंपारिक बॅटरीच्या तुलनेत अधिक पॉवर वाचवते. या बॅटरीला सेंसरप्रमाणे विकसित केले जाईल, जेणेकरून ते मानवी त्वचेला चिटकून ह्रदयाची ठोक्यांकडे लक्ष ठेण्यास मदत करेल.

जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, स्मार्टवॉच सारख्या इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये मोठी आणि कडक बॅटरीचा वापर होतो. यामध्ये पॉवर बॅकअप देखील कमी असतो. यामध्ये केमिकल लीकेजची भिती असते.

स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीचे संशोधक आणि केमिकल इंजिनिअर झेनान बाओ यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी बॅटरी नव्हती, जी शरीरानुसार स्ट्रेज होऊ शकेल. आम्ही या बॅटरीला इलेक्ट्रॉनिक्स केले आहे, जेणेकरून याचा सहज वापर करता येईल.

वैज्ञानिकांनी एक पॉलिमर देखील विकसित केले आहे. जे इलेक्ट्रोलाइट बॅटरीच्या ध्रुवामध्ये इलेक्ट्रिक चार्ज घेऊन जाते. बॅट्री वास्तविक आकारापेक्षा दुप्पट ओढणे, फिरवणे व मोडल्यानंतर देखील पॉवर आउटपूट कायम ठेवते.

या बॅटरीचा वापर पॉवर स्ट्रेचेबल सेंसर म्हणून देखील होऊ शकतो. त्वचेला चिटकून जे ह्रदयाच्या ठोक्यांकडे लक्ष देण्यास मदत करेल. या नवीन बॅटरीचा आकार अंगठ्याच्या नखाएवढा आहे.

Leave a Comment