हा हिंदी शब्द ठरला 2019 चा ‘वर्ड ऑफ द इअर’

भारतात गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्या तोंडी एकच शब्द आहे, तो म्हणजे ‘संविधान’. भारताच्या संविधानाला 70 वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे संविधानावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे.

आता ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेसने ‘संविधान’ शब्दला 2019 चा सर्वश्रेष्ठ ऑक्सफर्ड हिंदी शब्द म्हणून घोषित केले आहे. ऑक्सफर्डनुसार, 2019 मध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या गोष्टींना संविधानाच्या आधारावर मापण्यात आले.

2019 चा सर्वश्रेष्ठ ऑक्सफर्ड हिंदी शब्द हा मागील वर्षातील भारतातील परिस्थिती दर्शावत आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेसनुसार, संविधानाचा अर्थ लोकतांत्रिक सिद्धातांची एक अशी संस्था, ज्याद्वारे राज्य अथवा संघटनेला शासन करण्याची परवानगी मिळते. वर्ष 2018 मध्ये ‘नारी शक्ती’ला सर्वश्रेष्ठ शब्द म्हणून निवडण्यात आले होते.

ऑक्सफर्ड डिक्शनरी टीम आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून वर्षातील सर्वश्रेष्ठ हिंद शब्दांसाठी अर्ज मागवते. भारतातील टीम भाषेच्या विशेषतज्ञांच्या मदतीने वर्षातील सर्वोत्तम शब्दाची निवड करतात.

Leave a Comment