देशातील या सर्वात प्राचीन किल्ल्याचा महाभारतातही आढळतो उल्लेख

भारतात प्राचीन स्मारकांची कमी नाही. राजा महाराजांनी बांधलेले हजारो किल्ले आजही मजबूतीने उभे आहेत. मात्र भारतातील सर्वात प्राचीन किल्ला कोणता आहे माहिती आहे ?

पंजाबच्या बठिंडा शहरातील ऐतिहासिक ‘किल्ला मुबारक’ ला भारतातील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून ओळखले जाते. 6व्या शतकात बांधण्यात आलेल्या या किल्ल्यात ‘कुषाण’ काळातील विटा सापडल्या आहेत. या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती सम्राट कनिष्क आणि राजा दाबने केली होती. याचा उल्लेख ऋग्वेद आणि महाभारतात देखील आहे.

Image Credited – Scoopwhoop

या किल्ल्याबद्दल सांगितले जाते की, सन 1205 ते 1240 मध्ये रजिया सुल्तानाला पराभवानंतर याच किल्ल्यात बंदी बनवण्यात आले होते. रजिया सुल्तानाने किल्ल्याच्या बालकनीमधून उडी मारली होती.

Image Credited – Scoopwhoop

सन 1705 मध्ये 10वे शीख गुरू श्री गुरु गोबिंद सिंहजी यांनी या किल्ल्याचा दौरा केला होता. या दौऱ्याचे स्मरण म्हणून सन 1835 मध्ये महाराजा करम सिंह यांनी किल्ल्याच्या आत एक गुरुद्वारा बांधला. हा गुरुद्वारा आज ‘गुरुद्वारा श्री किल्ला मुबारक साहिब’ नावाने ओळखला जातो.

Image Credited – Scoopwhoop

या किल्ल्याचा वापर पटियाला राजवंशचे शासक निवासासाठी करत असे. 17व्या शतकात महाराजा अला सिंह यांनी किल्ल्यावर कब्जा केला होता व त्यांनी किल्ल्याचे नामकरण ‘फोर्ट गोबिंदगढ’ असे केले.

Image Credited – Scoopwhoop

या किल्ल्याचा आकार एखाद्या नावे सारखा आहे. या किल्ल्याचे प्रवेशद्वार देखील खास आहे. याच्या आतील भागाला किल्ला एंडरून म्हटले जाते. हा तो भाग आहे जेथे पटियाला राजवंशाचे लोक रहायचे. या किल्ल्यात मोती पॅलेस, राजमाता पॅलेस, शीश महल, जेलवाला पॅलेस आणि पॅलेस ऑफ मून नावाचे वेगवेगळे निवासस्थान देखील आहेत.

Leave a Comment