या खेळाडूने केले पॉन्टिंगचे ‘पंटर’ असे नामकरण

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर नावाने ओळखले जाते. क्रिकेट चाहत्यांपासून ते माध्यमांपर्यंत सर्वचजण पॉन्टिंगला पंटर नावाने ओळखतात. मात्र हे पंटर नाव पॉन्टिंगला कोणी दिले हे तुम्हाला माहिती आहे का ?

रिकी पॉन्टिंगने एका ट्विटर युजर्सने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या नावाचा खुलासा केला आहे. पाँन्टिंगने सांगितले की, त्याला पंटर हे नाव त्याचा सहकारी व ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने दिले आहे.

चाहत्याने पॉन्टिंगला प्रश्न विचारला की सर्वात प्रथम पंटर या नावाने कोणी हाक मारली ? यावर पॉन्टिंगने उत्तर दिले की, 1990 मध्ये जेव्हा आम्ही क्रिकेट अकादमीमध्ये रहायचे, त्यावेळी आम्हाला 40 डॉलर मिळत असे. तेव्ही मी टीबीएमध्ये कुत्र्यांवर पैसे लावायचो. तेव्हा मला शेन वॉर्नने ‘पंटर’ हे नाव दिले.

ऑस्ट्रेलियात ‘पंट’ हा शब्द कुत्रे अथवा घोड्यांवर पैसे लावण्यासाठी वापरला जातो.

पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने दोनदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले आहे. पॉन्टिंग आयपीएलमध्ये देखील अनेक संघाशी जोडलेला होता.

Leave a Comment