तब्बल 20 वेळा अटक झालेला पत्रकार झाला होता या देशाचा राष्ट्रपती

सर्वसाधारणपणे लोकांमध्ये चांगली प्रतिमा असेल, नाव असेल, त्या व्यक्तीवर एकही गुन्हा नसेल अशा व्यक्तीला देशाचे राष्ट्रपती बनवले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा राष्ट्रपतीबद्दल सांगणार आहोत, ज्यांना राष्ट्रपती बनण्याआधी 1-2 नव्हे तर तब्बल 20 वेळा जेलची शिक्षा भोगली आहे.

या राष्ट्रपतींचे नाव मोहम्मद नशीद आहे. ते 2008 ते 2012 असे 4 वर्ष मालदीवचे राष्ट्रपती होते. 2016 मध्ये त्यांना देशातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी दहशतवादामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता.

Image Credited – Amarujala

52 वर्षीय मोहम्मद यांचे शालेय शिक्षण मालदीव व पुढील शिक्षण श्रीलंकेत पार पडले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये देखील शिक्षण घेतले. 1990 मध्ये मायदेशात परतल्यानंतर ते सांगू नावाच्या मासिकेचे सहाय्यक संपादक झाले. हे मासिक तत्कालिन राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूमच्या सरकारवर टीका करत असे. यानंतर सांगूवर बंदी घालण्यात आली व मोहम्मद नशीद यांना नजरकैद केले. त्यानंतर त्यांना 18 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली.

1992 मध्ये त्यांना पुन्हा 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र 1993 मध्ये त्यांना सोडण्यात आले. 1994 मध्ये नशीद यांनी सरकारकडे स्वातंत्र्य पार्टी बनवण्यासाठी परवानगी मागितली. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही. एका लेखामुळे 1996 मध्ये पुन्हा सहा महिन्यांची शिक्षा झाली.

Image Credited – Amarujala

जेलमधून बाहेर आल्यावर राजकारणात येण्यासाठी 2 वर्ष त्यांनी खूप मेहनत घेतली. अखेर 1999 मध्ये पिपल्स मजलिस पार्टीने त्यांना मालदीवच्या संसदेचे सदस्य बनवले. 2001 मध्ये त्यांना पुन्हा अटक झाली. मागील सहा महिन्यात संसदेच्या एकाही कार्यवाहीमध्ये सहभागी न झाल्याने 2002 मध्ये त्यांना पक्षातून काढण्यात आले.

2003 मध्ये मालदीवची राजधानी माले येथे दंगली झाल्यानंतर नशीद श्रीलंकेला निघून गेले. दीडवर्ष तेथे राहिल्यानंतर 2005 ला पुन्हा मालदीवला आले. त्याचवर्षी जूनमध्ये मालदीव सरकारने राजकीय पक्षांना निवडणुकीत भाग घेण्यास परवानगी दिली. 2005 ते 2006 त्यांना पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले. याचा फायदा त्यांना 2008 ला मालदीवमध्ये पहिल्यांदा पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत झाला. मौमून अब्दुल गयूम यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले.

Image Credited – Amarujala

मोहम्मद नशीद यांना राष्ट्रपती म्हणून हवामान बदलावर मोठे काम केले. जानेवारी 2012 मध्ये त्यांना वरिष्ठ न्यायाधीशांना अटक करण्यास सांगितले. यामुळे अनेक लोक रस्त्यावर उतरले व नशीद यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. अखेर नशीद यांना राष्ट्रपतीचा राजीनामा द्यावा लागतो.  न्यायाधीशांना बेकायदेशीररित्या अटक केल्याने नशीद यांच्यावर कारवाई झाली.

Image Credited – Amarujala

फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळण्यात आले. मात्र मात्र मार्च 2015 मध्ये याच प्रकरणात त्यांना 13 वर्षांची शिक्षा झाली. डिसेंबरमध्ये ते उपचारासाठी सरकारकडून परवानगी घेऊन ब्रिटनला निघून गेले. 2016 मध्ये ब्रिटिश सरकार त्यांना एक राजकीय शरणार्थी म्हणून शरण दिले. यानंतर नशीद त्याच वर्षी श्रीलंकेला निघून गेले व 2018 पर्यंत तेथेच राहिले.

Image Credited – Amarujala

नोव्हेंबर 2018 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत नशीद यांच्या पक्षाला बहुमत मिळाले व इब्राहिम मोहम्मद सोलिह हे राष्ट्रपती झाले. यानंतर नशीद यांना देण्यात आलेली शिक्षा रद्द करण्यात आली व त्यांच्यावरील आरोप फेटळण्यात आले होते. त्यानंतर नशीद पुन्हा मायदेशी परतले.

Leave a Comment