या एका बटनाद्वारे डिलीट करा फेसबूकवरून शेअर केलेला सर्व डेटा

सोशल मीडिया साइट फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक खास बटन आणले आहे. याद्वारे युजर्स थर्ड पार्टी अ‍ॅप आणि वेबसाइट्ससोबत शेअर केलेला डेटा डिलीट करू शकतात. फेसबुकने यासाठी ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी टूल लाँच केले आहे.

इंटरनेटचा वापर करताना अनेक अनेक वेबसाइट्स व अ‍ॅपवर फेसबुकच्या मदतीने लॉग इन करावे लागते. असे केल्याने फेसबुक अकाउंट संबंधित डेटा देखील या वेबसाइट्स व अ‍ॅपसोबत शेअर होतो. हा सर्व डेटा आता युजर्स फेसबुकने आणलेल्या एका बटनाद्वारे डिलीट करू शकतात.

या डेटाद्वारे युजर्सला इंटरनेटवर जाहिराती पहायला मिळत असतात. आता या डेटावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेसबुकने ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी हे टूल लाँच केले आहे. वेबसाइट्स व अ‍ॅपसोबत शेअर केलेला डेटा युजर्स प्रायव्हेसी सेटिंग्समध्ये जाऊन क्लिअर करू शकतात.

Leave a Comment