कोरेगाव-भीमाप्रकरणी होणार देवेंद्र फडणवीसांची चौकशी?


मुंबई: कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे कोरेगाव-भीमा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी तपास आयोगाकडे मी केली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर फडणवीस यांनी आरोप केले होते. पण त्यानंतर त्यांच्याविरोधात फडणवीस यांनी कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment