गैरवर्तन केल्याप्रकरणी गणेश आचार्य विरोधात तक्रार दाखल


पुन्हा एकदा नव्या वादात बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य हे अडकले आहेत. आचार्य यांच्या विरोधात महिला आयोग आणि अंबोली पोलीस ठाण्यात एका ३३ वर्षीय महिला कोरिओग्राफरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तिने तक्रार दाखल केली आहे.

या महिलेला गणेश आचार्य यांनी कमिशनची मागणी तसेच अडल्ट व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. गणेश आचार्य हे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन नृत्य दिग्दर्शक संघटनेचे जनरल सेक्रेटरी असतानाही आपल्याला कमिशनची मागणी करत होते. तसेच, आपल्याला नेहमी त्रास देत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे. यापूर्वीदेखील गणेश आचार्य बऱ्याच वादात अडकले आहेत. त्यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्तानेही मीटू अंतर्गत आरोप केले होते.

Leave a Comment