CAA विरोध करणाऱ्या शर्जील इमामला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक


पाटणा: बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला अटक करण्यात आली आहे. शाहीन बाग येथे आयोजित नागरिकत्व कायद्याविरुद्ध करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून त्याच्यावर प्रक्षोभक भाषणांसाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध पाच राज्यांत शर्जीलविरुद्ध गुन्हे दाखल असून पोलीस त्याच्या मागावर गेल्या दोन दिवसांपासून होते.

Leave a Comment