ही तरुणी चक्क विमानाशी होणार विवाहबद्ध


बर्लिन : प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे, अशा आशयाचे एक गाणे आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचबरोबर प्रेमाला कोणतेही बंधन, जात, धर्म, देश याचे काही घेणे देणे नसते. प्रेम करणारी व्यक्ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. त्याबरोबर आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आनाभाका खातात. पण आम्ही आज तुम्हाला अशा एका प्रेमप्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला देखील शॉक बसेल. कारण बर्लिनमधील एक ३० वर्षीय मुलगी चक्क विमानाच्या प्रेमात आकांत बुडाली आहे. पण हे प्रेमप्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही. त्याहून पलिकडे विमानाच्या प्रेमात आकांत बुडालेली मुलगी चक्क विमानासोबतच विवाहबद्ध होणार आहे.

सध्या जर्मनीतील ही प्रेम कहाणी सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे. विमानाच्या प्रेमात आकांत बुडालेल्या या तरूणीचे नाव मिशेल कॉबेक असे असून ज्या विमानाच्या प्रेमात ही तरुण अडकली आहे त्या विमानाचे नाव बोईंग ७३७-८०० असे आहे. तिच्या आयुष्यात ६ वर्षांपूर्वी या विमानाची एन्ट्री झाली.

ती बोईंग ७३७-८०० ला प्रेमाने Schatz अशी हाक मारते. Schatz हा जर्मन शब्द असून आपल्याकडे Schatz या शब्दाचा ‘डार्लिंग’ असा अर्थ होतो. सध्या त्यांची ही प्रेमकथा सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. या प्रेमकथेला ‘द सन’या वृत्तपत्राने दुजोरा दिला आहे.

मिशेलने ज्यावेळी त्या विमानाला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर तिला आपल्या प्रियकराला भेटण्याची संधी मिळाली. आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. मिशेलच्या कुटुंबाला देखील तिच्या या नात्याविषयी माहित आहे. या नात्याला ऑब्जेक्ट सेक्शुऍलिटी किंवा ऑब्जेक्टोफिलिया असे म्हणतात. अशा स्थितीत व्यक्ती कोणत्याही निर्जीव गोष्टींकडे आकर्षित होतो.

Leave a Comment