चक्क उंदरामुळे 24 तास उशीरा झाले विमानाचे उड्डाण

अनेक कारणांमुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. विमानाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी घातलेला गोंधळ देखील आपण अनेकदा पाहतो. मात्र कधी एखाद्या उंदरामुळे विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाल्याचे ऐकले आहे का ? नाही ना. मात्र वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) विमानतळावर एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उड्डाण घेण्यास तब्बल 24 तास उशीर झाला.

विमानतळावर शनिवारी रात्री विमानात प्रवाशांना उंदीर दिसल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर  प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. मात्र शोधाशोध केल्यानंतर देखील उंदीर कोठेच सापडला नाही. या दरम्यान प्रवाशांना 24 तासांसाठी हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. अखेर  सोमवारी सकाळी एअर इंडियाच्या एअरबस 319 ने देहरादूनसाठी उड्डाण घेतले.

एव्हिशनच्या नियमानुसार, विमानात उंदीर असल्यास विमान उड्डाण घेऊ शकत नाही. उंदराने एअरक्राफ्टच्या एखाद्या तारेला नुकसान पोहचवले तर धोका निर्माण होऊ शकतो.  विमानाने उड्डाण घेण्यासाठी उंदीर मुक्त सर्टिफाय असणे गरजेचे आहे. हा उंदीर विमानात कसा आला की तो आधीच विमानात होतो ? हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

वाराणसी विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर यांनी सांगितले की, विमानला रोडेट फ्री घोषित करण्यासाठी योग्य तो तपास करण्यात आला व सोमवारी सकाळी विमानाने देहरादूनच्या दिशेने उड्डाण घेतले.

Leave a Comment