आधार-मतदान ओळखपत्र लिंक करण्यास कायदा मंत्रालयाची मंजूरी

मतदान ओळखपत्राला आधारकार्डशी लिंक करण्यासाठी कायदा मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. निवडणूक आयोगाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. काही अटींसह या प्रस्तावाला मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.

कायदा मंत्रालयाकडून निवडणूक आयोगाला स्पष्ट करण्यात आले आहे की, डेटा चोरी होऊ नये यासाठी योग्य ती पाऊले उचलली जावीत. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, आधारला मतदान ओळखपत्राशी जोडल्याने बनावट मतदारांना मतदान यादीतून बाहेर काढण्यात येईळ.

याबाबत निवडणूक आयोगाकडून मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आधार कार्ड घेणे व मतदान ओळखपत्रात याचा वापर करण्याचा अधिकार देण्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1950 मध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. हा अधिकार मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसर लोकांना मतदान ओळखपत्र बनवताना अथवा ज्यांचे आधीच आहेत त्यांना आधार लिंक करण्यास सांगू शकतील.

आता हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवला जाणार असून, येथे प्रस्ताव पास झाल्यास त्याचे कायद्यात बदल करण्याची सुरूवात होईल. संसदेच्या दोन्ही सदनात कायदा मंजूर झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रक्रिया सुरू करेल व मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment