स्पर्श न करता इकडून तिकडे वस्तू हलविणार रोबो ग्रीपर


फोटो सौजन्य टेक एक्स्प्लोर
कोणतीही वस्तू स्पर्श न करता इकडची तिकडे हलविणे माणसाला शक्य नाहीच पण मशीनसाठी सुद्धा हे काम अवघडच. मात्र आता वैज्ञानिकांनी असा एक रोबोटिक ग्रीपर तयार केला आहे जो वस्तूला स्पर्श न करता एकीकडून दुसरीकडे ती वस्तू अगदी सुरक्षित नेऊ शकेल. अगदी छोट्या, नाजूक वस्तू या रोबोटिक ग्रीपरच्या सहाय्याने आणि ध्वनीतरंगांच्या मदतीने त्यामुळे हलविता येणार आहेत. या रोबोटिक ग्रीपरचा प्रोटोटाईप तयार झाला आहे.

स्वित्झर्लंडच्या ईटीएच झुरीच येथील संशोधकांनी या रोबोटिक ग्रीपर साठी दोन अर्धगोल वस्तू आणि एकाच प्रकारचे दोन हेडफोन वापरले आहेत. अर्धगोल वस्तूमध्ये मायक्रोचीप असून त्या सर्किट बोर्डला जोडलेल्या आहेत. एक छोटी वस्तू अल्ट्रासाऊंड किरणांनी नियंत्रित केली जाते. संशोधक मार्शल शुक म्हणतात, या पद्धतीला ध्वनीतोलन असे म्हटले जाते. घड्याळात वापरले जाणारे अगदी बारीक सुटे भाग, सेमी कंडक्टर यासाठी पारंपारिक रोबो ग्रीपर उपयुक्त असले तरी काही वेळा त्यामुळे त्या नाजूक वस्तूंचे नुकसान होऊ शकते. हा रोबो ग्रीपर मुलायम आणि रबराचा असल्याने हे नुकसान टळते. यात अल्ट्रासाऊंड वेव्ह एक दबाव क्षेत्र तयार करतात. हे क्षेत्र माणसाला दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. दबाव बिंदू ध्वनीतरंग रुपात एक प्रकारचे जाळे तयार करतात त्यात या छोट्या वस्तू अडकतात आणि त्या हवेत तरंगतात. त्यामुळे स्पर्श न करता या वस्तू एकीकडून दुसरीकडे हलविता येतात.

या तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीपासून अंतराळात केला जात असला तरी आता तो रोबो ग्रीपर मध्ये शक्य झाला आहे. त्यामुळे अंतराळात सुद्धा आता अगदी छोट्या वस्तू सहज आणि सुरक्षित हलविणे शक्य होणार आहे.

Leave a Comment