या नामवंत कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर आहेत काही बंधने


गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अमेझोन या बलाढ्य कंपन्यात नोकरी मिळणे हे अनेकांचे स्वप्न आहे. या कंपन्यात कर्मचाऱ्याना मिळणाऱ्या सोईसवलती नेहमीच लोकांच्या चर्चेत असतात. पण या कंपन्यात कर्मचाऱ्यांवर काही बंधने सुद्धा आहेत याची माहिती अनेकांना नसते. कोणती आहेत ही बंधने? जाणून घेऊ या.

आयबीएम या कंपनीने २०१८ पासून कर्मचाऱ्याना पेन ड्राईव्ह तसेच मायक्रोचीप वापरण्यावर बंदी घातली आहे तर इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील दिग्गज टेस्लाने कर्मचाऱ्यांना ब्लाइंड आय या अॅपचा वापर करता येणार नाही असे बजावले आहे. या अॅप मुळे नाव जाहीर न होता कंपनीविषयीची चर्चा करता येत असे.

अमेझॉनने हवामान बदलाचा कंपनीच्या पर्यावरणावर काय प्रभाव पडला त्याची चर्चा करण्यास बंदी घातली आहे. तसेच बेजोस यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तेथील कर्मचारी पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन देऊ शकत नाही तर त्याला त्याऐवजी सहा पानी मेमो बनवावा लागतो. मायक्रोसॉफ्टने लोकप्रिय गुगल डॉक्स अॅप वापरण्यावर पूर्ण बंदी घातलेली नसली तरी संबंधित कर्मचाऱ्याला हे अॅप वापरणे गरजेचे असल्याचे पटवून द्यावे लागते. या कंपनीत ग्रामरली अॅपच्या वापरावर मात्र बंदी आहे.

गुगल मधील कर्मचारी ऑफिस मध्ये राजकीय विषयावर चर्चा करू शकत नाहीत. तर फेसबुक मध्ये आयफोन वापरण्यावर बंदी आहे. त्यामागे फेसबुक सीइओ मार्क झुकेरबर्ग आणि अॅपल सीईओ टीम कुक यांच्यातील मतभेत कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कंपनीने मात्र अँड्राईड हीच जगातील सर्वात लोकप्रिय ओएस असल्याने कर्मचाऱ्यांनी ती वापरावी यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे कारण सांगितले आहे.

Leave a Comment