भूसुरुंग शोधून नष्ट करणारे हिरो उंदीर


फोटो सौजन्य आयबीटाईम
उंदीर म्हटले की प्रथम आपल्या नजरेसमोर येते उंदरांमुळे होणारे नुकसान आणि मग आठवतात गणपती बाप्पा. कारण उंदीर हे त्यांचे वाहन. आता या उंदरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी कामगिरी ते बजावत आहेत. कंबोडियात या उंदरांना विशेष प्रशिक्षण दिले जात असून तेथे हे हिरो उंदीर भूसुरुंग शोधून ते नष्ट करण्याचे महत्वाचे काम करत आहेत. यामुळे हजारो लोकांचा जीव वाचविला गेला आहे.

जगभरात भूसुरुंग ही मोठी समस्या असून अनेक निष्पाप लोकांना या भूसुरुंगामुळे जीव गमवावे लागत आहेत. भूसुरुंग शोधणारे हिरो उंदीर प्रशिक्षित आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम अँटी पर्सनल लँडमाईन डिटेक्शन प्रोडक्ट डेव्हलपमेंट (APOPO) ही संस्था करते आहे. यात उंदरांना भूसुरुंग शोधणे आणि ते नष्ट करणे शिकविले जाते आणि त्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक उंदरावर ४०० रुपये खर्च केला जातो. आठवड्यातील पाच दिवस अर्धा ते एक तास हे प्रशिक्षण चालते.


अश्या प्रशिक्षित उंदरांनी आत्तापर्यंत सुमारे १७० भूसुरुंग शोधून काढले आहेत. सिरोप प्रांतातील त्रापियांग कासांग गावात सुमरे ७८८२५७ चौरस मीटर जमिनीत हे भूसुरुंग पेरले गेले होते. आता भूसुरुंग मुक्त झालेली ही जमीन १९ कंबोडियन कुटुंबाना परत केली गेली आहे. केवळ कंबोडियातच नाही तर यापूर्वी या हिरो उंदरांनी अंगोला, झिम्बावे, कोलंबिया या देशात सुद्धा ही कामगिरी यशस्वी केली असून अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत.

Leave a Comment