डोके दुखतेय? – हे करून पहा.

आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे डोके. डोक्याच्या कवटीत आपला मेंदू असतो व हा मेंदूच सार्‍या शरीराचे नियंत्रण करत असतो. डोके दुखीचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणे अवघड. डोके दुखायला लागले की कांही सुचेनासे होते. अशा वेळी चटकन एखादी वेदनाशामक गोळी घेण्याकडे आपला सहजच कल असतो. पण डोके नक्की कोणत्या कारणाने दुखते हे कळले तर त्यावर अगदी सहज सोपे उपाय करूनही ही डोकेदुखी थांबवता येते. त्यासाठी ही माहिती जरूर वाचा.

१)डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे.

२) बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.

३)वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळे डोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.

३)अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.

४)सर्दी अथवा बारीक ताप किवा अंग मोडून येणे यासारख्या आजारातही डोके दुखते. गरम पाण्याच्या पिशवीने डोके शेकून काढल्यास ही डोकेदुखी थांबते. अथवा अमृतांजन किवा तत्सम बाम डोक्यास चोळल्यासही आराम पडतो.

५) बरेच वेळा जादा वाचन, टिव्ही पाहणे अथवा डोळ्यावर ताण आणणारी कामे झाल्यासही डोके दुखते. अशा वेळी डोळ्यांना चष्मा आला नाही ना याची खात्री करून घ्यावी. डोळ्याला नंबर आल्यानेही डोकेदुखी होते व योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरवात केली की ती बंद होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही