या सामान्य व्यक्तींना असामान्य कामासाठी पद्मश्रीने केले जाणार सन्मानित

भारत सरकारने 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस, अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मविभूषण आणि माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

यासोबतच सरकारने लंगर बाबा, चाचा शरीफ, अंकल मूसा, अक्षर पंत, सुंदरबन के सुजान आणि हाथी के साथी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या 21 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. एकूण 118 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.  सर्व सामान्य व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेकांना पद्म पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Scroll

अब्दुल जब्बार –

मध्य प्रदेशाच्या भोपाल येथील 63 वर्षीय अब्दुल जब्बार यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्यांना वॉइस ऑफ भोपाल नावने ओळखले जाते. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर त्यांनी महिला व पिडितांसाठी आवाज उठवत त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. मागील वर्षी त्यांचे निधन झाले.

Image Credited – Amarujala

जगदीश लाल आहूजा –

पंजाबच्या 84 वर्षीय जगदीश लाल आहूजा यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. त्यांना लंगर बाबा नावाने ओळखले जाते. वर्ष 1980 पासून ते गरीब लोकांसाठी मोफत जेवण उपलब्ध करत आहेत. लोकांच्या मदतीसाठी त्यांनी आपली संपत्ती देखील विकली.

Image Credited – Amarujala

मोहम्मद शरीफ –

चाचा शरीफ नावाने प्रसिद्ध मोहम्मद शरीफ यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. उत्तर प्रदेशचे 80 वर्षीय मोहम्मद शरीफ फैजाबाद व आजुबाजूच्या भागातील लावारिस मृतदेहांचा अंत्यसंस्कार करतात. सायकल मॅकेनिक असलेले मोहम्मद शरीफ यांनी मागील 25 वर्षात 25 हजारांपेक्षा अधिक मृतदेहांचा अंत्यसंस्कार केला आहे.

Image Credited – Amarujala

जावेद अहमद टाक –

काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात राहणारे 46 वर्षीय जावेद अहमद टाक दहशतवाद्यांच्या गोळीमुळे दिव्यांग झाले होते व तेव्हापासून व्हिलचेअरवर आहेत. मागील 2 दशकांपासून ते ह्यूमेनिटी वेलफेअर आर्गेनायजेशन काश्मिर अँड जॅबा आपा स्कूलद्वारे काश्मिरमधील विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करत आहेत. जवळपास 100 विद्यार्थ्यांना ते मदत करत आहेत.

Image Credited – Amarujala

तुलसी गौडा –

कर्नाटकच्या 72 वर्षीय तुलसी गौडा यांना सामाजिक कल्याणसाठी (पर्यावरण) पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. त्यांना कोणतेही शिक्षण झालेले नसताना जंगलातील वनस्पतीचे जबरदस्त ज्ञान आहे. मागील 60 वर्षांपासून त्यांना हजारो झाडे लावण्यापासून त्यांची काळजी देखील घेतली आहे.

Image Credited – Amarujala

सत्यनारायण मुंदेयूर –

केरळमध्ये जन्म झालेल्या सत्यनारायण मुंदेयूर यांनी अरुणाचल प्रदेशला आपली कर्मभूमी बनवले आहे. मुंबईतील सरकारी नोकरी सोडून ते 1979 मध्ये अरूणाचलमध्ये स्थायिक झाले. तेथेच त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे काम केले. यासाठी त्यांनी ग्रामीण भागात 13 ग्रंथालयांची स्थापना केली. लहान मुलांना मोफत पुस्तकांचे वितरण होते.

Image Credited – Amarujala

एस रामकृष्णन –

तामिळनाडूचे 65 वर्षीय दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते एस रामकृष्णन यांना पद्मश्री दिला जाईल. त्यांना लोक अमर सेवानी नावाने देखील ओळखतात. त्यांनी देशातील सर्वात मोठे दिव्यांग पुर्नवसन केंद्र अमेर सेवा संगमची स्थापना केली. जेथे मागील 4 दशकात 800 पेक्षा अधिक गावांमधील 14 हजार दिव्यांगाचे पुर्नवसन केले आहे. येथे दिव्यांगाना सर्व मुलभूत सुविधा दिल्या जातात.

Image Credited – Amarujala

मुन्ना मास्टर –

61 वर्षीय मुन्ना मास्टर यांचे राम-कृष्ण भजन ऐकून लोकांचे मन पवित्र होते. जयपूरच्या बगरू येथे मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुन्ना मास्टर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येईल. मुन्ना मास्टर 5 वेळा नमाज पठण करतात, भजन गातात, त्यांना संस्कृत देखील येते व गौसेवा देखील करतात.

Image Credited – Amarujala

डॉ. योगी ऐरन –

देहरादूनचे हेल्पिंग हँड नावाने हॉस्पिटल चालवणारे 81 वर्षीय योगी ऐरन यांनी आपल्या आयुष्यातील 35 वर्ष भाजलेल्या लोकांच्या उपचार व सेवेसाठी घालवली आहेत. त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान होईल. ते दरवर्षी 500 रुग्णांचा मोफत उपचार करतात.

Image Credited – Amarujala

सुंदरम वर्मा –

ड्रायलँड एग्रोफोरेस्ट्री नावाच्या जनसंरक्षण तंत्राद्वारे राजस्थानच्या शेखावटी भागात 50 हजारांपेक्षा अधिक झाडे लावणाऱ्या सुंदरम वर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्यांनी सहा नर्सरी देखील सुरु केल्या आहेत. जेथून जवळपास दीड लाख झाडे शेतकऱ्यांना वाटली जातील.

Image Credited – Amarujala

राहीबाई सोमा पोपरे –

56 वर्षीय राहीबाई सोमा पोपरे यांना सीड मदर म्हणून ओळखले जाते. अहमदनगरमधील एक अशिक्षित अदिवासी शेतकरी असलेल्या राहीबाई सोमा पोपरे यांना अदिवासी क्षेत्रातील कामासाठी पद्मश्री पुरस्कराने सन्मानित केले जाईल. त्यांनी 50 एकर जमिनीत भाताची व भाजीपाल्याची शेती केली. शेतात जलसंरक्षणावर काम केले व जमीन सुपीक केली.  त्यामुळे उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढले.

Image Credited – Amarujala

हिम्मताराम भंभू –

राजस्थानमध्ये राहणारे हिम्मताराम भंभू शेतकरी व पर्यावरणवादी म्हणून निसर्गाच्या संरक्षणसाठी मागील अनेकवर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी जंगल वाचवणे व वृक्षारोपणासाठी मोठे काम केले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

Image Credited – Amarujala

मूझिकाल पंकाजाक्षी –

केरळच्या मूझिकाल पंकाजाक्षी या लुप्त होत चाललेली कला नोकुविद्याच्या संवर्धनसाठी काम करत आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

Leave a Comment