सर्वेक्षण : सोशल मीडियाचा वापर करणारे लाखो युवक झाले एकलकोंडे

अमेरिकेची लोकसंख्या जवळपास 33 कोटी आहे. यातील 61 टक्के म्हणजेत 10 पैकी 6 लोक हे एकटेपणाने ग्रस्त आहेत. यामध्ये वाढच होत चालली असून, मागील एक वर्षातच अशा लोकांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात सर्वाधिक संख्या अशा युवकांची आहे जे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. यामध्ये ज्या युवकांचे वय 30 पेक्षा कमी व नोकरी लागून केवळ सहाच महिने झाले आहेत, अशांचा समावेश आहे.

अमेरिकेची विमा कंपनी सिग्नाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. सिग्नाने 2018 पासून असा अहवाल सादर करण्यास सुरुवात केली असून, हे दुसरे वर्ष आहे.

सर्वसाधारणपणे वृद्धांमध्ये एकटेपणा अधिक आढळतो. मात्र सर्वेक्षणानुसार, याच्या उलट दिसून येत आहे. यानुसार 18 ते 22 वयोगटातील 50 टक्के युवकांनी सांगितले की, त्यांना एकटेपणा वाटतो. यामध्ये सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या युवकांचे प्रमाण अधिक आहे. तसेच 58 टक्के महिला आणि 64 टक्के पुरुषांनी सांगितले की सर्व सुविधा असताना देखील त्यांना एकटेपणा जाणवतो.

या लक्षणांद्वारे तुम्ही देखील एकटेपणाने ग्रस्त होऊ शकता –

  • लोकांपर्यंत तुमचे म्हणणे पोहचू न शकणे.
  • लोकांशी जवळीकता वाढवण्यास न जमणे.
  • अनेक ओळखीचे लोक, मात्र जवळचे मित्र नाही.
  • असे वाटते की, लोक तुम्हाला समजून घेत नाही.
  • असंख्य लोक आजुबाजूला असताना देखील एकएकटे राहायला आवडते.
  • स्वतःबद्दल नकारात्मक भावना
  • काम व जीवनात संतुलन नाही.
  • सहकर्मचाऱ्यांशी पटत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment