राजाची घड्याळे चोरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला एवढ्या वर्षांचा तुरुंगवास

दक्षिण आफ्रिकेतील देश मोरक्कोचे राजा मोहम्मद सहावे यांची 36 घड्याळे चोरी करण्याच्या आरोपाखाली एका महिला सफाई कर्मचाऱ्याला 15 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रत्येक घड्याळाची किंमत 14 लाख रुपये होती. महिला सफाई कर्मचाऱ्याचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

महिलेकडून घड्याळ खरेदी करणाऱ्या सोने व्यापाऱ्यासह 14 अन्य पुरुषांना देखील 4 वर्षांची शिक्षा झाली आहे. महिलेने अनेक घड्याळे वितळवून त्यातील रत्न काढले व त्यांना विकून मोठी रक्कम जमा केली होती.

चौकशी दरम्यान आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी यासाठी एक गँग तयार केली होती. मात्र त्यांना या लूटीबद्दल काहीही माहिती नव्हते. एका आरोपीने सांगितले की त्याने या पैशांपासून 11 लाख रुपये किंमतीची गोल्फ कार्स खरेदी केली. तर आरोपी महिलेने बहिणीच्या नावाने 18 लाख रुपये किंमतीचे एक अपार्टमेंट बुक केले होते.

मोरक्कोचे राजा मोहम्मद यांना लग्झरी घड्याळ, पेटिंग खरेदी करणे, नवीन कार आणि याटमध्ये फिरण्याची आवड आहे. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी पटेक फिलिपचे घड्याळ घातले होते. या घड्याळाची किंमत 8.5 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता.

Leave a Comment